नवी दिल्ली : WhatsApp ने जाहीर केले आहे की नवीन प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्त्यांची खाती १५ मेनंतर बंद केली जातील. त्यामुळे WhatsApp यूजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणजेच प्रायव्हसी धोरण न स्वीकारल्यास वापरकर्ते व्हॉट्सअॅपची काही वैशिष्ट्ये वापरू शकणार नाहीत.
WhatsApp ने स्पष्टीकरण दिलेले आहे की, गोपनीयता धोरण न स्वीकारणार्या वापरकर्त्यांचे खाते बंद होणार नाही. तर गोपनीयता धोरण स्वीकारण्यासाठी अशा वापरकर्त्यांना १५ मे नंतर एक सूचना पाठविली जाईल. अशाप्रकारे व्हॉट्सअॅपच्या वतीने व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना काही आठवड्यांसाठी सतत रिमाइंडर्स पाठविले जाईल. या वेळी व्हॉट्सअॅप यूजर्सनी नवीन प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारल्यास ते चांगले आहे, अन्यथा WhatsApp यूजर्सना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
गोपनीयता धोरण न स्वीकारल्यास वापरकर्ते व्हॉट्सअॅपची काही वैशिष्ट्ये वापरू शकणार नाहीत. वापरकर्ते त्यांच्या चॅट यादी पाहू शकणार नाहीत. यावेळी, केवळ WhatsApp चे येणारे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल स्वीकारण्यास सक्षम असतील. त्याचबरोबर, येत्या काही आठवड्यांत WhatsApp ने नवीन गोपनीयता धोरण स्वीकारले नाही तर व्हॉट्सअॅपवर येणारी ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल सूचना येणे बंद होईल. तसेच WhatsApp वर मेसेज पाठविता येणार नाही. याशिवाय व्हॉट्सअॅप वापरणारेही कॉल करू शकणार नाहीत. आपण गोपनीयता धोरण स्वीकारत नसाल तर व्हॉट्सअॅप खाते बंद केले जाणार नाही. पण व्हॉट्सअॅपच्या कुठल्याही फीचरचा वापर देखील करता येणार नाही.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…