ग्लोबल

खळबळजनक! तरुणीला चुकून दिले कोरोना लसीचे सहा डोस, मग झाला असा परिणाम..

टस्कनी : कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, इटलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीला फायजरच्या कोरोना लसीचे सहा डोस एकदमच देण्यात आले. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर या महिलेला खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टस्कनी येथील नोआ रुग्णालयात रविवारी हा प्रकार घडला. एका आरोग्य कर्मचाऱ्याने चुकून सिरींजमध्ये लशीच्या कुपीमधील सगळे डोस भरले. या कुपीमध्ये सहा डोस असतात. लस दिल्यानंतर या कर्मचाऱ्याने पाच रिकाम्या सिरिंज पाहिल्या आणि त्यानंतर झालेला प्रकार आरोग्य कर्मचाऱ्याच्या लक्षात आला.

रुग्णालयाची प्रवक्ता डॅनियला गियानली यांनी सांगितले की, या तरुणीची प्रकृती चांगली असून तिला कोणताही आजार नाही. लस दिल्यानंतर तिला २४ तास रुग्णालयात ठेवण्यात आले होते. मात्र, प्रकृतीवर कोणताच परिणाम झाला नसल्याचे दिसून आल्यानंतर तिला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. डॅनियला म्हणाल्या की, सध्या तरुणीच्या प्रकृतीवर आणि इम्यून सिस्टीमवर डॉक्टर देखरेख ठेवत आहेत. जेणेकरून लशीच्या अतिरिक्त डोसमुळे तिच्या प्रकृतीवर कोणताही दुष्परिणाम होऊ नये. रुग्णालयाने या प्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

15 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago