twitter website shows jammu kashmir and ladakh as separate country
नवी दिल्ली : ट्विटर आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला तणाव आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. ट्विटरने यावेळी पुन्हा एकदा भारताचा चुकीचा नकाशा दाखवला आहे. सरकारशी संबंधित सूत्रांनी दावा केला आहे की ट्विटरने आपल्या वेबसाईटवर दाखविलेल्या भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश केलेला नाही. ट्विटरने जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र देश असल्याचं आपल्या वेबसाइटवर दाखवले असल्याचा आरोप आहे.
ट्विटरच्या करिअर पेजवर ट्वीप लाइफ विभागात जगाचा नकाशा आहे. येथून कंपनी हे दाखवते की संपूर्ण जगात ट्विटरची टीम आहे. मागील वर्षीही ट्विटरने भारताच्या नकाशासोबत छेडछाड केली होती. त्यावेळी लडाखला भारताचा भाग म्हणून दाखवले गेले नव्हते. मात्र, नंतर त्यात सुधारणा करण्यात आली होती.
सरकार आता ट्विटरच्या विरोधात उघडपणे बोलत असून रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरची भारताबद्दल दुटप्पी भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. ट्विटरच्या करियर पेजवरील भारताच्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखचा समावेश नाही. म्हणजेच ते सीमेच्या बाहेर दर्शविलेले आहेत. सोशल मीडियावर लोक याबाबत टीका करीत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत ट्विटरचे निवेदन आले नाही. परंतु, जर सरकारने ट्विटरला नोटीस पाठवली आणि त्यानंतरही ट्विटरने दुरुस्ती केली नाही तर आयटी कायद्याच्या कलम 69 अ अंतर्गत ट्विटरवर कारवाई केली जाऊ शकते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…