TV actress Amarin Bhatt shot dead by terrorists In Jammu Kashmir
जम्मू-काश्मीर : टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. अमरीन जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये चडुरा भागातील हशरू येथे आपल्या घराजवळ 10 वर्षीय पुतण्यासोबत उभी होती, त्यावेळी हा हल्ला झाला. बुधवारी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तिचा पुतण्याही जखमी झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 7.55 च्या सुमारास चदूरा भागात अमरीन भट नावाच्या महिलेच्या घरावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अमरीनवर अंदाधुंद गोळीबार केला, यावेळी त्यांच्या 10 वर्षांच्या पुतण्याच्या हाताला गोळी लागली. हल्ला झाल्यानंतर दोघांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी अमरीनला मृत घोषित केले. पुतण्यावर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केला आहे. त्यांचा शोध घेणे सुरू आहे. अमरीनने काही टीव्ही मालिकांत काम केले आहे. ती सध्या सोशल मीडियावर सक्रिय होती. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अमरीन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…