Tonk hostel owner rapes 10-year-old girl for a month, booked under POCSO
राजस्थान : एका खाजगी वसतिगृह मालकाने १० वर्षांच्या चिमुकलीवर महिनाभर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात वसतिगृह मालकासह चौघांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार, पीडिता आपल्या धाकट्या भावासह शिक्षणासाठी या वसतिगृहात राहत होती. या काळात वसतिगृह मालक मुकेश गुर्जर हा रात्रीच्या वेळी पीडितेच्या धाकट्या भावाला दुसऱ्या खोलीत झोपवून तिच्यावर बलात्कार करत असे. आरोपीने मुलीला आणि तिच्या भावाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याने, मुलीने याबाबत कोणालाही काहीही सांगितले नाही. मात्र, काही काळानंतर पीडितेची तब्येत बिघडू लागली आणि संसर्ग वाढल्याने तिच्या आईला संशय आला. वारंवार विचारपूस केल्यानंतर अखेर मुलीने वसतिगृहात झालेल्या बलात्काराचे काळे सत्य आईसमोर उघड केले.
पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, मुलीने दोन महिन्यांनंतर वसतिगृहात राहण्यास नकार दिला होता, मात्र भीतीमुळे ती काही बोलली नव्हती. दरम्यान, मुलगी दुसऱ्या वसतिगृहात राहू लागल्यानंतर तिच्या आरोग्य समस्या वाढू लागल्या आणि त्यामुळे हा प्रकार समोर आला.
पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी मुख्य आरोपी वसतिगृह संचालक मुकेश गुर्जर, त्याचा साथीदार हरिराम मीना, हरिरामची पत्नी मनीषा मीना आणि वॉर्डन मनीष गुर्जर यांच्याविरुद्ध POCSO कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.
या घटनेनंतर संतापाची लाट उसळली असून स्थानिक नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…