three boy and a girl found in ambulance arrested by police
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील वाराणसीमधून एक अतिशय लज्जास्पद घटना समोर आली आहे. निर्जन भागात उभी असलेली एक रुग्णवाहिका बघून काही जणांना शंका आली, त्यामुळे त्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांनी येऊन रुग्णवाहिका तपासली तर त्यांना तिच्यात तीन तरुण आणि एक तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळले. पोलिसांनी या सर्वांना अटक केली आहे. ही घटना वाराणसीत असलेल्या सुजाबाद पोलिस चौकी जवळ घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजाबाद पोलिस चौकी जवळ असलेल्या निर्जन भागात काही जणांना एक उभी असलेली रुग्णवाहिका हलताना दिसली. बराच वेळ देखील ही रुग्णवाहिका तेथून गेली नाही, तसेच ती हलत देखील होती. त्यामुळे लोकांना हे संशयास्पद वाटलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.
पोलिसांनी तात्काळ येऊन रुग्णवाहिका तपासली तर त्यांना धक्काच बसला. या रुग्णवाहिकेत तीन तरुण आणि एक तरुणी आक्षेपार्ह स्थितीत आढळले. पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेतले आणि रुग्णवाहिका जप्त केली. या चौघांविरूद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे.
ही रुग्णवाहिका मंडुआडीह भागातील गंगा सेवा सदन नावाच्या एका खासगी रुग्णालयाची असून रुग्णालयाने ती एका तरूणाला भाड्याने दिली होती. कोरोनाच्या या कठीण काळात एकीकडे अनेक ठिकाणी रुग्णवाहिकांची कमतरता भासत असताना अशा घटना समोर येणं हे खरं तर लाजिरवाणं आहे, असंच म्हणावं लागेल.
यवतमाळ हादरले! एकतर्फी प्रेमातून तरुणीची निर्घृण हत्या
धक्कादायक : समुद्रकिनारी बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली आणि अनर्थ घडला..
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…