देश

देशप्रेम : दहशतवाद्यांसोबत राहून त्यांचा खात्मा करणारे शहीद मेजर मोहित शर्मा यांची चित्तथरारक कहाणी

भारताच्या संरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या सैन्यदलाच्या सेवेत असताना शहीद मेजर मोहित शर्मा यांनी अशी काही कामगिरी केली, जी येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी देशप्रेमाचा एक आदर्श ठेवून गेली. देशाप्रती कमालीचं प्रेम असणाऱ्या या व्यक्तीनं या जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांच्या योगदानाविषयी वाचताना उर अभिमानानं भरुन येतो. दहशतवाद्यांमध्ये राहून त्यांचा खात्मा करण्याचं धाडसी आणि महान कार्य मेजर मोहित शर्मा यांनी केलं होतं.

मेजर मोहित शर्मा हे पॅरा स्पेशल फोर्सच्या तुकडीत सेवेत होते. त्यांनी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांमध्ये राहून त्यांना असा विश्वास दिला होता, की आपणही या दहशतवादी संघटनेचा भाग असून आपल्यालाही भारतीय सैन्यावर निशाणा साधायचा आहे. भारतीय सैन्याकडून गुप्तहेर म्हणून मेजर शर्मा हिज्बुलमध्ये गेले होते. त्यांनी आपल्या भावाला 2001 मध्ये भारतीय सैन्याकडून ठार करण्यात आल्याचं सांगत फसवलं होतं. त्यानंतर त्यांना  पुढील ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात नेण्यात आलं. तिथं त्यांची ओळख होती, इफ्तिखार भट्ट.

मेजर मोहित शर्मा यांनी हिज्बुलच्या दहशतवाद्यांसोबत संपर्क वाढवला होता. अबू तोरारा आणि अबू सबजार अशी त्या दहशतवाद्यांची नावं असल्याचं सांगण्यात येतात. मेजर शर्मा यांनी त्यांची ओळख इफ्तिखार भट्ट म्हणून सांगितली. त्यांनी दहशतवाद्यांचा विश्वास जिंकला होता, भारतीय सैन्यावर हल्ला करण्याचा त्यांचा खोटा मनसुबा दहशतवाद्यांना खरा वाटला. आर्मी चेकपॉईंटवर हल्ला करण्याचा आपला बेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. जोपर्यंत आपण भारतीय सैन्यावर हल्ला करत नाही तोवर मूळ गावीही परतणार नसल्याचं त्यांनी दहशतवाद्यांना पटवून दिलं. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांना आपण अंडरग्राऊंड होणार असल्याचं सांगितलं जेणेकरुन हत्यारं आणि हल्ल्यासाठीचं सामान एकवटता येईल. तोरारा आणि सबजारनं या इफ्तिखारसाठी ग्रेनेडची व्यवस्था केली आणि जवळच्या गावांतून आणखी तीन दहशतवादी त्यांच्या मदतीसाठी दिले.

तोरारा आणि सबजारला मेजरवर शंका आली होती. पण, त्यावर तुम्हाला माझी शंका असेल तर मला मारून टाका असं म्हणत त्यांनी पुन्हा त्यांचा विश्वास जिंकला. मेजरनी त्यांची एके47 जमिनीवर टाकली. तोरारानं सबजारकडं पाहिलं आणि त्यांना मेजरवर विश्वास बसला. तितक्यातच ते बेसावध असताना मेजरनी संधी साधत या दोन्ही दहशतवाद्यांचा तिथेच खात्मा केला.

मेजर मोहित शर्मा 21 मार्च 2009 मध्ये ब्रावो अस़ॉल्ट टीमचं नेतृत्त्व करत असताना कुपवाडा येथे चकमक झाली. त्यांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि आपल्या 2 सहकाऱ्यांचेही प्राण वाचवले. मेजर नेतृत्त्व करत असणाऱ्या ऑपरेशनला रक्षक असं नाव देण्यात आलं होतं. देशासाठी असामान्य कामगिरी करणाऱ्या मेजर शर्मा यांनी दोन साथीदारांचे प्राण वाचवले पण, ते वीरगतीस प्राप्त झाले होते. मरणोत्तर अशोक चक्र या बहुमानानं मेजर शर्मा यांचा भारत सरकारनं सन्मान केला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago