Serial killer arrested, 18 women killed after wife ran away with another man
हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी महिलांची हत्या करणाऱ्या सिरियल किलरला अटक केली आहे.या ४५ वर्षीय आरोपीने १८ महिलांची हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. अटक केल्यानंतर नुकत्याच दोन महिलांच्या झालेल्या हत्या प्रकरणाचा उलगडाही झाला आहे.
वृत्तानुसार, याआधी त्याला २१ प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. यामध्ये १६ हत्या, संपत्तीशी संबंधित चार गुन्ह्यांचा समावेश आहे. एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तो पोलीस कोठडीतून पळून गेला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयाच्या २१ व्या वर्षी आरोपीचं त्याच्या आई-वडिलांनी एका तरुणीशी लग्न लावून दिल होतं. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच त्याची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेली होती. तेव्हापासून त्याच्या मनात महिलांबद्दल द्वेष निर्माण झाला होता. आरोपीने २००३ पासून गुन्हे करण्यास सुरुवात केली. शरीरसुखाच्या बहाण्याने अविवाहित महिलांना तो आपल्या जाळ्यात ओढत असे. त्यानंतर एकत्रित मद्यप्राशन केल्यानंतर तो त्या महिलेची हत्या करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू चोरुन पळून जात असे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…