The Serum Institute will supply the corona vaccine to 100 countries
सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि युनिसेफ (UNICEF) यांनी कोरोना लस कोविशील्ड आणि नोव्हाव्हॅक्सच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी करार केला आहे. या कराराअंतर्गत 100 देशांना 1.1 अब्ज लसीचे डोस पाठविण्यात येणार आहेत. भारत जगातील सर्वात मोठ्या औषध उत्पादक देशांपैकी एक आहे आणि कोरोना लस खरेदी करण्यासाठी बर्याच देशांनी आपल्याशी संपर्क साधलेला आहे.
ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राजेनेकाची कोरोना वॅक्सीन कोविशील्ड पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट तयार करत आहे, आणि नोवॅक्सचं उत्पादन यूएस-आधारित नोव्हॅक्स इंक द्वारे केलं जात आहे. युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरीटा फोर यांनी सीरम संस्थेबरोबर कराराची घोषणा केली.
युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेनरीटा फोर म्हणाल्या कि, आम्ही पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन (PAHO) सह अनेक संस्थांबरोबर मिळून 100 देशांसाठी 1.1 अब्ज लशींच्या डोसची ऑर्डर दिली आहे. ही लस ३ अमेरिकन डॉलरमध्ये निम्न व निम्न मध्यम उत्पन्न असणार्या लोकांना दिली जाईल.
युनिसेफने म्हटले आहे की आम्ही जागतिक आरोग्य संघटनेद्वारे लसीच्या मंजुरीच्या अधीन असलेल्या देशांमध्ये या लसींचे वितरण करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट बरोबर काम करण्यास उत्सुक आहोत.
कमी उत्पन्न गटाच्या लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्यासाठी कोवॅक्स उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. त्याचे नेतृत्व संयुक्त राष्ट्र संघ करत आहे. कोवॅक्स उपक्रमांतर्गत 145 देशांतील मजूर आणि निम्न उत्पन्न गटातील लोकांना स्वस्त दरात कोरोना लस दिली जाईल. त्यासाठी कोवॅक्समध्ये सहभागी असलेल्या संघटना कोरोना लस बनविणार्या अनेक कंपन्यांशी करार करत आहेत.
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…