देश

चमत्कार! डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं नवजात कबरीत सापडलं जिवंत..

बनिहाल : जम्मू-काश्मीरच्या बनिहालमधून एक आगळीवेगळी बातमी समोर येतेय. एका नवजात मुलीला म्हणजेच जन्मानंतर लगेचच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. त्यानंतर नवजात मुलीला दफन केल्यानंतर लगेचच सुमारे एका तासाच्या आत कबरीतून जिवंत बाहेर काढलं.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्थानिक लोकांनी मुलीला स्मशानभूमीत दफन करण्यास विरोध केला होता आणि तिच्या कुटुंबानं स्मशानभूमीत दफन करण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर मुलगी चमत्कारिकरित्या जिवंत सापडल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात आंदोलनं केलं. त्याची दखल घेत प्रशासनाने डिलिव्हरी रूममध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

स्थानिक सरपंच मंजूर अल्यास वाणी यांनी सांगितले की, ही मुलगी बशारत अहमद गुजर आणि शमीना बेगम यांची आहे. हे दाम्पत्य रामबन जिल्ह्यातील बनिहालपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बनकूट गावचे रहिवासी आहेत. नॉर्मल प्रसूतीद्वारे सोमवारी उपजिल्हा रुग्णालयात मुलीचा जन्म झाला. मुलीला मृत घोषित करण्यात आलं आणि तिला दोन तास रुग्णालयात कोणत्याही डॉक्टरांनी पाहिलं नाही, त्यानंतर कुटुंबाने तिला होल्लान गावात दफन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्थानिक लोकांनी मुलीला स्मशानभूमीत दफन करण्यास विरोध केला. यामुळे कुटुंबीयांना सुमारे तासाभरानंतर मुलीला कबरीतून बाहेर काढावं लागलं. जेव्हा मुलीला कबरीतून बाहेर काढले तेव्हा ती जिवंत असल्याचे आढळून आले, त्यानंतर कुटुंबीय तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.

प्रारंभिक उपचारानंतर, मुलीला तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचारासाठी श्रीनगरला पाठवले, या घटनेनंतर, कुटुंब आणि इतरांनी रुग्णालयाच्या आवारात डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचार्‍यांच्या अव्यावसायिक वृत्तीच्या विरोधात आंदोलन केलं. बनिहाल ब्लॉक मेडिकल ऑफिसर (बीएमओ) डॉ राबिया खान यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आम्ही स्त्रीरोग विभागात काम करणार्‍या कनिष्ठ कर्मचारी नर्स आणि सफाई कामगारांना तत्काळ निलंबित केले आहे. तपासणीनंतर तपशीलवार माहिती सामायिक केली जाईल, असे डॉ. खान यांनी सांगितले.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात वृद्ध महिलेने केली पतीची मदत, उच्च न्यायालयाने फेटाळला जामीन

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago