देश

भारताचं पहिलं लढाऊ विमान ‘तेजस’ बनवणाऱ्या एचएएल मधील 15 टक्के भागीदारी सरकार विकणार

तेजस हे भारताचं पहिलं स्वदेशी लढाऊ विमान बनवणारी कंपनी एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेडचा 15 टक्के भाग विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ऑफर फॉर सेलद्वारे कंपनीच्या या भागभांडवलाची विक्री होणार आहे. या माध्यमातून सरकारला 5 हजार कोटी रुपये मिळतील अशी शक्यता आहे.

ऑफरची फ्लोअर प्राईस कंपनीच्या 1001 रुपये प्रति इक्विटी शेअरवर निश्चित करण्यात आली आहे, जी सध्याच्या शेअर बाजाराच्या दराच्या तुलनेत सुमारे 15 टक्के कमी आहे. एचएएलने रेग्युलटरी फायलिंगमध्ये सांगितलं आहे की, “ऑफर फॉर सेल 27 आणि 28 ऑगस्टला स्टॉक एक्स्चेंजच्या वेगळ्या विण्डोवर असेल. ऑफर फॉर सेलअंतर्गत कंपनीचे प्रमोटर एक्स्चेंज फ्लॅटफॉर्मवर आपले शेअर विकून कंपनीतील आपली भागीदारी कमी करतात.

सरकारने 3,34,38,750 इक्विटी शेअर विकण्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यात कंपनीचे 10 टक्के पेडअप शेअर कॅपिटल आहे, ज्यात अतिरिक्त 5 टक्के भागीदारी किंवा 1,67,19,375 इक्विटी शेअर विकण्याचा पर्याय आहे.

हिंदुस्तान एरॉनॉटिक्समध्ये सरकारची 89.97 टक्के भागीदारी आहे, जी मार्च 2018 मध्ये स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड होती. कंपनीच्या रेग्युलटरी फायलिंगमध्ये म्हटलं आहे की, “ऑफर साईजचा 20 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 25 टक्के म्युचल फंडसाठी आरक्षित असेल. एचएएल कंपनी बऱ्यापैकी आपल्या संशोधनावर अवलंबून आहे आणि हेच याचं वैशिष्ट्ये आहे. याशिवाय अनेक उत्पादनांच्या निर्मितीसाठी टेक्नोलॉजी ट्रान्सफर आणि लायसन्स अॅग्रिमेंटही करण्यात आलेलं आहे. ही कंपनी संरक्षण मंत्रालयाच्या कक्षेत येते.

उत्पादन मूल्याच्या दृष्टीने ही संरक्षण क्षेत्राची सर्वात मोठी सरकारी कंपनी आहे. एचएएल कंपनीला जून 2007 मध्ये नवरत्न कंपनीचा दर्जा मिळाला होता. ही कंपनी अनेक प्रकारची संरक्षण उत्पादनं बनवते. याशिवाय उत्पादनाचं डिझाईन, डागडुजी, देखभाल इत्यादीचंही काम करते. याच्या उत्पादनाच्या यादीत विमान, हेलिकॉप्टर, एव्हिओनिक्स, अॅक्सेसरीज आणि एयरोस्पेस स्ट्रक्चरचा समावेश आहे. लढाऊ विमान तेजस, ध्रुव, चीता, चेतक, लेन्सर आणि रुद्रा हे याच कंपनीची उत्पादनं आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

7 दिवस ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago