महाराष्ट्र

तुकाराम मुंढेंच्या बदली विरोधात आपचे नागपुरात आंदोलन

ठाकरे सरकारकडून बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, यामध्ये तुकाराम मुंढे यांच्या नावाचा समावेश आहे. नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबईत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. आज चार वाजता आम आदमी पार्टीकडून मुंढे यांच्या समर्थनार्थ आणि बदलीच्या विरोधात नागपुरात आंदोलन केले जाणार आहे. तुकाराम मुंढे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांनी स्वतःला घरीच आयसोलेट केलं आहे.

राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. ज्या शहरात तुकाराम मुंढे आयुक्त म्हणून किंवा प्रशासकिय अधिकारी म्हणून गेले, तिथं त्यांना स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधाचा सामना करावा लागला आहे. नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी निवड झाल्यापासूनच मुंढे यांचे नगरसेवकांशी वाद सुरु झाले होते. सर्वपक्षीय नगरसेवकांचा तुकाराम मुंढे यांना विरोध होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago