देश

भाजपचा मोठा निर्णय : पीएलआय योजनेतून 10 सेक्टरमधील उद्योगांना 2 लाख कोटींचे पॅकेज..

नवी दिल्ली : देशात गुंतवणूकदार वाढावेत आणि देशातील उद्यागांना उभारी मिळावी म्हणून मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारने देशातील 10 क्षेत्रातील उद्योगांना पीएलआय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सरकारने उद्योगांसाठी 2 लाख कोटींचे नवे पॅकेज जाहीर केले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय जाहीर करताना ही माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण 10 सेक्टरमधील उद्योगांना पीएलआय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. पीएलआय योजनेचा लाभ रेफ्रिजीरेटर, वाशिंग मशीन, औषधी, वाहन, दूरसंचार, कपडे, खाद्यपदार्थांचे उत्पादन, मोबाईल फोनची बॅटरी अशा उद्योगांत गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना मिळेल.निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, या योजनेमुळे वेगवेगळ्या उत्पादनांच्या निर्मात्यांना प्रोत्साहन देईल. देशाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाण्यास या योजनेचा लाभ होईल. या योजनेमुळे देशात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या उद्योगांना या योजनेचा चांगला लाभ मिळेल.

सीतारामन यांनी सांगितल्या प्रमाणे

  1. इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान उत्पादन उद्योग- 5 हजार कोटी
  2. वाहन तसेच वाहनांचे सुटे भाग बनवणारे उद्योग- 57 हजार 42 कोटी
  3. औषधी- 15 हजार कोटी
  4. दुरसंचार आणि नेटवर्कींग संबंधित उत्पादन घेणारे उद्योग- 12 हजार 195 कोटी
  5. वस्त्रोद्योग- 10 हजार 683 कोटी
  6. खाद्य उत्पादन-10 हजार 900 कोटी
  7. फ्रिज, वाशिंग मशीन- 6 हजार 238 अशा स्वरुपाचे पॅकेज पीएलआयच्या माध्यमातून मिळेल.

पीएलआय म्हणजे, देशातली उद्योगांच्या उत्पादनांची विक्री जास्त व्हावी म्हणून सरकारकडून प्रोत्साहनपर आर्थिक मदत दिली जाते. विदेशी उद्योगधंदे भारताकडे आकर्षित व्हावेत हा देखील उद्देश पीएलआय या योजनेमागे आहे. पीएलआयमुळे निर्मिती क्षेत्रातील उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago