देश

महिला दिनी तरुणीवर सामूहिक बलात्कार, बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी पसार

जागतिक महिला दिनी तरुणीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थान येथील अजमेरमध्ये गुजरातच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकून आरोपी तेथून पसार झाले. पोलिसांनी तरुणीला JLN रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रामगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही पोलीस कर्मचारी गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एक तरुणी बेशुद्धावस्थेत रस्त्यावर पडलेली आढळली. पोलिसांनी तिची अवस्था बघून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, महिला पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. या तरुणीने जबाबात सांगितले कि, “काही तरुणांनी तिला अज्ञात ठिकाणी नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला तिथेच सोडून ते तेथून पळून गेले.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गुजरातची आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरु आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago