Suraj Kumar Dubey, a naval officer, was not abducted
पालघर : भारतीय नौदलातील अधिकारी सूरजकुमार दुबे यांचा पालघरमधील वेवजी तलासरी येथील जंगलात अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याने मृत्यू झाला होता. पोलिस चौकशीत दुबे यांनी सांगितलं होतं कि, त्यांचे खंडणीसाठी चेन्नई येथून अपहरण झाले होते आणि खंडणी न दिल्यामुळे अपहरणकर्त्यांनी त्यांना जिवंत जाळले. मात्र तपासादरम्यान हे सर्व प्रकरण अपहरण व खंडणीचे नसून आत्महत्येचे असल्याच्या निष्कर्षापर्यंत पालघर पोलीस पोहोचले आहेत.
५ फेब्रुवारी रोजी सूरजकुमार दुबे यांना वेवजी येथील जंगलात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आल्याची माहिती समोर आली होती. उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला होता. खंडणीसाठी अपहरण करून मारून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा जबाब दुबे यांनी मृत्यूच्या आधी घोलवड पोलिसांकडे दिला होता.
पालघर पोलिसांनी याप्रकरणी डहाणूचे उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दहा पथके तयार करून विविध ठिकाणी तपास केला. ३० जानेवारी रोजी चेन्नई विमानतळाच्या बाहेरुन अज्ञात व्यक्तींनी आपलं अपहरण केलं, असा आरोप त्यांनी केला होता. परंतु, चेन्नई विमानतळ, विमानतळाजवळ असलेल्या एका हॉटेलमधील आणि बस स्टॅण्डवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सूरजकुमार दुबे मुक्तपणे वावरत असल्याचे पुरावे प्राप्त झाले. त्याचप्रमाणे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान दुबे चेन्नई- वेल्लोर प्रवास करून वेल्लोर येथील काही हॉटेलमध्ये राहिल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यांनी एटीएममधून पैसे काढल्याचे देखील पुरावे पोलिसांकडे आहेत.
सूरजकुमार दुबे या अधिकाऱ्याने आपले नातेवाईक, मित्र तसंच लग्न ठरल्यानंतर सासऱ्याकडून मोठ्या रकमेचं कर्ज घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शेअर बाजाराच्या व्यवहारासाठी वापरत असलेल्या तिसऱ्या मोबाइलची, शेअर बाजारात गुंतवणूक केल्याची अथवा कर्जबाजारी झाल्याची कोणत्याही नातेवाईकाला माहिती दिली नसल्याचं पोलीस तपासात पुढे आलं आहे. दुबे यांनी फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, ४ फेब्रुवारीच्या रात्रीत एका वाहनातून आपल्याला चेन्नईहून तलासरी येथे आणण्यात आलं असं नमूद केलं असलं तरी १५०० किलोमीटरचा प्रवास करण्यास जास्त वेळ लागतो.
महिनाभराच्या सुट्टीसाठी आलेल्या या अधिकाऱ्याने १३ बँकांमध्ये मोठ्या रकमेच्या कर्जासाठी चौकशी केल्याची ‘सिबिल’ कडून माहिती प्राप्त झाली आहे. त्यांनी तलासरी येथील पेट्रोल पंपावरून तीनशे रुपयांचे डिझेलचे ड्रम खरेदी करून त्या ड्रममध्ये पेट्रोल खरेदी केल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले. त्यामुळे खंडणी व अपहरणाच्या दिशेने सुरु असलेला तपास आत्महत्याकडे वळल्याचे प्राथमिक निष्कर्षातून पुढे आले. सूरजकुमार दुबे यांनी लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांना हे पैसे परत करता येत नव्हते. या कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी दुबे यांनी स्वत: ला पेटवून घेतले. यात ते गंभीरपणे भाजले. नौसैनिक दुबे यांचा मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…