Sanjay Rathore
मुंबई : वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटची बैठक पार पडली, त्यावेळी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांसह वनमंत्री संजय राठोडही उपस्थित होते. कॅबिनेट बैठकीनंतर वनमंत्री संजय राठोड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. वर्षा बंगल्यावर सर्व शिवसेना नेत्यांची बैठक सुरु असल्यामुळे संजय राठोड यांच्याबद्दल काय निर्णय घेतला जाईल, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेले संजय राठोड काल पोहरादेवी येथे गेले होते. यावेळी संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. परंतु, संजय राठोड यांनी केलेलं शक्तीप्रदर्शन शरद पवार यांना आवडलं नाही. संजय राठोड प्रकरणाचा फटका मुख्यमंत्री आणि सरकारच्या प्रतिमेला होत असल्याचं शरद पवार यांचं मत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे आता या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. एकूणच संजय राठोड यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याचं दिसत आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…