देश

हवाई प्रवासादरम्यान कोरोना नियमांचं पालन न करणं महागात पडणार, डीजीसीए ने दिला ‘हा’ इशारा

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नियम योग्य पद्धतीने ना पाळल्यास डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. डीजीसीएकडून  यासंदर्भात एक परिपत्रक काढण्यात आलं आहे.

विमानतळावर दाखल झाल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रवाशांना योग्य पद्धतीने मास्कचा वापर करावा लागेल. तसेच प्रवासादरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात येईल, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. विमानात बसलेले असतानाही काही प्रवासी कोविड नियमांचं पालन करण्यास टाळाटाळ करतात, असं डीजीसीए ने म्हटलं आहे. कोविड १९ प्रोटोकॉलनुसार, प्रवाशांनी योग्य पद्धतीनं मास्क परिधान करणं तसंच सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.

DGCA च्या परिपत्रकातील मुद्दे : 

  1. विमानतळावर कोणताही प्रवासी विनामास्क प्रवेश करणार नाही, प्रवेश द्वारावर तैनात सीआयएसएफ किंवा इतर पोलीस कर्मचारी हे सुनिश्चित करतील. सीएएसओ किंवा इतर सुपरवायजिंग अधिकारी यांची ही जबाबदारी असेल.
  2. विमान प्रवासादरम्यान प्रत्येक ठिकाणी मास्कचा वापर करणं प्रवाशांना बंधनकारक राहील. तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागेल. कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीशिवाय मास्क नाकाच्या खाली घेतलं जाऊ नये.
  3. प्रवासी विमानतळ परिसरात प्रत्येक ठिकाणी मास्कचा वापर करत आहे तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आहेत, हे एअरपोर्ट डायरेक्टर / टर्मिनल मॅनेजर सुनिश्चित करतील.
  4. नियमांचं उल्लंघन करताना एखादा प्रवासी आढळल्यास त्याला इशारा दिल्यानंतर सुरक्षा यंत्रणेच्या स्वाधीन केलं जाईल. त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई केली जाईल.
  5. विमान उड्डाणापूर्वी विमानात बसलेला कोणताही प्रवासी इशाऱ्यानंतरही मास्क योग्य पद्धतीनं परिधान करत नसेल तर त्याला विमानातून खाली उतरवण्यात येईल. एखादा प्रवासी विमान प्रवासादरम्यान वारंवार मास्क परिधान करण्यास नकार देत असेल किंवा कोविड प्रोटोकॉल्सचं पालन करत नसेल तर त्याला ‘उपद्रवी प्रवासी’ करार देण्यात येऊन त्या प्रवाशाला प्रवासास बंदी घालण्यात येईल.
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago