महाराष्ट्र

बाळ बोठेला हैदराबाद येथून अटक, बोठे राहत असलेल्या रूमला होतं बाहेरून कुलूप

अहमदनगर : रेखा जरे यांच्या हत्याकांडमधील प्रमुख सूत्रधार असलेला आरोपी बाळ बोठेला हैदराबाद येथून अटक करण्यात नगर पोलिसांना यश आलं आहे. ज्या रूम मध्ये बाळ बोठे होता त्या रूमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. तरीदेखील पोलिसांनी बाळ बोठेला जेरबंद केलं आहे. बाळ बोठेला मदत करणाऱ्या इतर पाच जणांना देखील पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण 11 आरोपींना अटक केली आहे.

रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर सुपा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तातडीने तपास करत पोलिसांनी मारेकऱ्यासह पाच आरोपींना अटक केली. चौकशी केल्यानंतर मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे याने सुपारी देऊन ही हत्या केल्याची माहिती समोर आली होती. या गुन्ह्यात नाव आल्यापासून बोठे फरार झाला. पीचएडीची पदवी घेण्यासाठी उस्मानिया विद्यापीठात असताना झालेल्या ओळखीच्या आधारे तो या भागात लपून बसला होता. त्यावेळी हैदराबाद येथील एका वकीलाशी त्याची ओळख झाली होती. त्याचीच मदत बोठेने घेतली. या वकिलाने त्याला बिलालनगर या गुन्हेगारांच्या लपण्याच्या कुप्रसिद्ध भागात ठेवले होते.

हैदराबाद येथे बाळ बोठे असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस या भागातील प्रतिभानगर परिसरातील एका हॉटेलवर गेले. त्यातील रूम नंबर १०९ मध्ये बोठे लपून बसल्याची माहिती पोलिसांना होती. मात्र, रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी बोठे याने वेगळ्या नावाने बुकिंग केलेले होते. ओळख लपविण्यासाठी दाढी वाढवून आणि वेषांतर करून तो राहत होता. मात्र, तो तेथेच असल्याची माहिती पक्की असल्याने पोलिसांनी रुमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. रुममध्ये बोठे एकटाच होता. त्याला ताब्यात घेण्यात आले.

बोठे याच्या खोलीतून काही मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यांत अनेक ठिकाणी शोध मोहीम राबविली. हैदराबादमध्ये देखील तीन दिवसांपासून कारवाई सुरू होती. तेथेही तीन ठिकाणांहून पोलिस पोहचण्यापूर्वी तो पळून गेला होता.

अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाला गुंगारा देत बोठे फरार झाला होता. शेवटी पोलिसांनीही अत्यंत गोपनीयता पाळत मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस सायबर सेलची मदत घेऊन सूत्रबद्धरित्या तपास केला. पथकातील पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन मोहीम फत्ते केली. जरे यांनी बोठेबद्दल पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. आपली बदनामी होऊ नये, या कारणावरून बोठे याने सुपारी देऊन जरे यांची हत्या घडवून आणल्याचे तपासात उघड झाले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago