देश

राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी येथील जत्रेत चेंगराचेंगरी, 3 महिला भाविकांचा मृत्यू

राजस्थान : राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी येथील जत्रेत सोमवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३ महिला भाविकांचा मृत्यू झाला. पहाटे ५ वाजता मंदिराचे प्रवेशद्वार उघडताच गर्दी अनियंत्रित झाली आणि लोकांनी धक्काबुक्की सुरू केली. या घटनेत तीन महिला भक्तांचा मृत्यू झाला तर अनेक भाविक जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. सध्या या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेवर शोक व्यक्त करताना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, ‘सीकर येथील खाटूश्यामजींच्या मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे दर्शनासाठी आलेल्या ३ महिलांचा मृत्यू होणे अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. शोकाकुल परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत, देव त्यांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो आणि मृतांच्या आत्म्याला शांती देवो. चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या भाविकांना लवकरात लवकर बरे होवो ही कामना.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago