rapecase
पुणे : पुणे शहरात गुलटेकडी परिसरातील १५ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडीत मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आरोपी महेश ईश्वर मोरे (२५, रा. गुलटेकडी, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षीय शाळकरी मुलगी, तिच्या आई-वडील आणि लहान बहिणीसोबत राहत होती. पीडित मुलीचे आई-वडील दोघेही काम करतात. 19 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगी तिच्या शाळेत शिवजयंतीनिमित्त आयोजित नाटकात सहभागी झाली होती. त्यादिवशी जेव्हा ती घरी कपडे बदलत होती, तेव्हा आरोपी तिच्या घरात घुसला आणि तिच्यावर धमकावून बलात्कार केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. दरम्यान, जुलै महिन्यात आरोपी आणि त्याच्या मित्राने तिचे अपहरण करून तिला मुंबईमध्ये नेले होते.
पीडित मुलीने दिलेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी महेश मोरेला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…