Six children burnt alive as straw catches fire in Bihar's Araria
बिहार : अररिया जिल्ह्यातील पलासीच्या कबाया गावात एकाच कुटुंबातील 6 मुलांचा भाजून मृत्यू झाला. ही सर्व मुलं अडीच ते 5 वर्षांची होती. ते सर्वजण एका खोलीत मक्याचे कणीस भाजत होते. मात्र, तिथे जवळच गुरांसाठी सुका चारा ठेवलेला होता. त्यात ठिणगी पडून अचानक आग लागल्यामुळे ही मुले तिथे अडकून पडली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आग लागल्यानंतर इतर मुलांनी आरडाओरड केली, त्यानंतर मुलांना वाचवण्यासाठी आसपासचे लोक धावले. गर्दीतील काही तरुणांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलांपर्यंत पोहोचण्याआधीच निष्पाप मुलांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने अग्निशमन विभागालाही कळविण्यात आले. पोलिसांनी मुलांचे मृतदेह काढून जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. आगीच्या घटनेमुळे आणि आगीत 6 निरपराध मुलांनी जीव गमावल्यामुळे कबैय्या गावात शोककळा पसरली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…