देश

१५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध बलात्कार नाही

प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाची अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील टिप्पणी वादग्रस्त ठरली आहे. १५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणं बलात्कार ठरत नाही, असा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान दिला. भारतीय दंड विधानाच्या कलम ३१५ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार, १५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणं बलात्काराच्या श्रेणीत येत नाही, असं न्यायाधीशांनी सांगितलं आहे.

मुरादाबादची रहिवासी असलेल्या पत्नीने आपल्या पतीविरुद्ध ८ सप्टेंबर २०२० रोजी भोजपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. पतीनं याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अलाहाबाद न्यायालयासमोर गुरुवारी हे प्रकरण सुनावणीसाठी दाखल झालं होतं. आरोपी पती खुशाबे अली याच्या जामीन याचिकेवर न्यायमूर्ती मो असलम यांनी सुनावणी केली. या प्रकरणात हुंड्यासाठी छळ, अल्पवयीन पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि अप्राकृतिक शारीरिक संबंध असे आरोप पतीवर ठेवण्यात आले आहेत.

उच्च न्यायालयाने या प्रकरणी आरोपी पतीला जामीन मंजूर केला आहे. पतीच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार, पीडितेने मॅजिस्ट्रेटसमोर दिलेल्या जबाबात अप्राकृतिक संबंध आणि पतीच्या भावांकडून बलात्कार या आरोपांना नकार दिला होता. दरम्यान, १५ वर्षांहून अधिक वयाच्या पत्नीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित करणे हे बलात्काराच्या श्रेणीत येत नाही, असं न्यायाधीशांनी सांगितलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago