देश

ब्रेकिंग! गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलिंडर आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आठ महिन्यांनंतर घरगुती सिलिंडरचे दर 50 रुपयांनी महागले आहेत. 6 जुलै 2022 पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती स्थिर होत्या. तर व्यावसायिक सिलिंडरच्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ झाली आहे.

आजपासून दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1769 रुपयांऐवजी 2119.5 रुपयांना मिळेल. कोलकात्यात तो 1870 रुपये होता, आता तो 2221.5 रुपये झाला आहे. मुंबईत त्याची किंमत 1721 रुपयांवरून आता 2071.50 रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये 1917 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 2268 रुपयांना मिळणार आहे.

घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ :
घरगुती LPG सिलेंडरची किंमत आजपासून 50 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नवीनतम सुधारणांसह, दिल्लीत आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत 1103 रुपये प्रति सिलिंडर असेल.

व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ :
तसेच, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 350.50 रुपयांची वाढ करण्यात आली असून या वाढीमुळे दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2119.50 रुपये इतकी होईल. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.

स्थानिक करांमुळे घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती राज्यानुसार बदलतात. इंधन विक्रेते दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करतात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 महिने ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 महिने ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 महिने ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago