देश

गौप्यस्फोट : कोरोना विषाणूचा कुठलाही नैसर्गिक पूर्वज नाही, कोरोना ही चीनचीच निर्मिती…

लंडन : सार्स सीओव्ही २ म्हणजे कोरोना विषाणूचा कुठलाही नैसर्गिक पूर्वज नाही. कोरोना विषाणूचे मूळ शोधून काढण्याची मागणी जगभरात लावून धरण्यात येत असतानाच हा विषाणू चीनने जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून तयार केल्याचा दावा एका अभ्यास अहवालात करण्यात आला आहे. वुहानच्या प्रयोगशाळेतील चीनचे वैज्ञानिक यात सामील होते, नंतर त्यांनी तो वटवाघळातूनच आला असे दाखवण्यासाठी त्याचे रूप त्या पद्धतीने बदलले व तो नैसर्गिक वाटेल अशा पद्धतीने त्याची रचना केली, असा गौप्यस्फोट ब्रिटिश प्राध्यापक अँगस डालगेश व नॉर्वेचे वैज्ञानिक बर्गक सोरेनसेन यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात केला आहे.

शोधनिबंधात म्हटले आहे की, सार्स सीओव्ही २ म्हणजे कोरोना विषाणूचा कुठलाही नैसर्गिक पूर्वज नाही. हा विषाणू चीनच्या वैज्ञानिकांनी गेन फंक् शन प्रकल्पात कृत्रिमरीत्या तयार केल्याचे दिसून आले. वुहान येथील प्रयोगशाळेत त्यांनी पहिल्यांदा वटवाघळातील विषाणूंची रचना अभ्यासण्याचा प्रयत्न केला होता. चीनच्या गुहांमध्ये सापडलेल्या वटवाघळांतील विषाणू घेऊन त्याचे रूप काटय़ाप्रमाणे केले. त्याचे रूपांतर नंतर घातक कोविड १९ विषाणूत झाले, नंतर त्यांनी तो नैसर्गिक विषाणू असल्याचा बनाव केला. या संशोधन निबंधात म्हटले आहे, की या विषाणूमध्ये ज्या खुणा आढळतात त्यावरून तरी मानवनिर्मित असल्याचे सिद्ध होते. चीनचे संशोधक वटवाघळातील विषाणूसारखा विषाणू तयार करण्यासाठी रिव्हर्स इंजिनियरिंगचे प्रयोग करीत होते. चीनच्या आतापर्यंतच्या संशोधनाचा पाया दुसरीकडील वस्तू घेऊन त्या उघडून त्यातील रचना पाहून त्यांची नक्कल करणे हाच आहे. तीच पद्धत त्यांनी हा विषाणू तयार करताना वापरली व नंतर तो प्रयोग त्यांच्या अंगाशी आला व हा विषाणू संपूर्ण जगात पसरला. त्यानंतर या विषाणूबाबतची माहिती नष्ट करण्यात आली. चीनचे वैज्ञानिकही यावर काही बोलायला तयार नाहीत.

धक्कादायक खुलासा : चीनकडून 2015 मध्येच ‘कोरोना विषाणू’ शस्त्र म्हणून वापरण्याचा विचार, अमेरिकेला मिळाले पुरावे

‘सायन्स जर्नल क्वार्टरली रिव्ह्य़ू बायोफिजिक्स डिस्कव्हरी’ या नियतकालिकात हा २२ पानांचा शोधनिबंध प्रकाशित होणार आहे. चीनचा गेन फंक् शन प्रकल्प हा नैसर्गिक विषाणूत बदल करण्याचाच होता. त्यामुळे ते जास्त संसर्गजन्य होतात. ओबामा प्रशासनाने हा प्रकल्प बेकायदा असल्याचे म्हटले होते. या विषाणूचे वैशिष्टय़ असे, की त्याच्या काटेरी पृष्ठभागावर चार अमायनो आम्ले असतात व ती धनभारित असतात. ती मानवी पेशीतील ऋणभारित घटकांना जाऊन चिकटतात. त्यामुळे तो विषाणू जास्त संसर्गजन्य होतो. ही अमायनो आम्ले एकमेकांना नष्ट करतात. चार अमायनो आम्ले नैसर्गिक विषाणूत एकाच रांगेत कधीच नसतात. वुहान इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेतील वैज्ञानिकांनीच कोरोनाचा कृत्रिम विषाणू तयार केला, असा आरोप ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनीही केला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…

1 दिवस ago

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

2 आठवडे ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

2 आठवडे ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

2 आठवडे ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

2 आठवडे ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

2 आठवडे ago