Maharashtra Mantralaya building security beefed up after bomb threat call
मुंबईः मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, अशी माहिती अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिली. बॉम्ब खरच ठेवण्यात आला आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. पण खबरदारी म्हणून तपासणी केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांची पळापळ झाली. रविवार असल्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीत माणसांची उपस्थिती कमी होती. पण जेवढे नागरिक आतमध्ये होते त्यांना बाहेर काढून तातडीने मंत्रालयाची इमारत रिकामी करण्यात आली.
बॉम्ब स्क्वाड आणि डॉग स्क्वाड यांच्या मदतीने बॉम्बचा शोध सुरू झाला. एक टीम विधीमंडळाच्या सचिवालयातही तपास करत आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्यातील काही नेते मंडळींना धमक्यांचे फोन आले होते. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक झाली होती.
पोलिसांनी सांगितले कि, फोन येताच पोलिसांनी मंत्रालय आणि विधीमंडळाच्या सचिवालयाला घेराव घातला असून दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. बॉम्ब स्क्वाड आणि डॉग स्क्वाड यांच्या मदतीने बॉम्बचा शोध सुरू आहे. फोन कुठून आला आणि कोणी केला याचा शोध घेण्याचे काम पोलिसांचे स्वतंत्र पथक करत आहे. बॉम्ब संदर्भातली माहिती ही बनावट असल्यास कायदयानुसार फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक करुन कारवाई केली जाईल. माहिती खरी असल्याचे आढळले तर त्या व्यक्तीला माहिती कशी मिळाली याची चौकशी केली जाईल. तसेच माहिती देऊन मोठे संकट टाळल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीचा उचित सन्मान केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…