देश

Video : रेल्वे कर्मचाऱ्याने रेल्वे ट्रॅकवर उडी मारत वाचवला एका व्यक्तीचा जीव, रेल्वे मंत्रालयाने केले कौतुक

पश्चिम बंगाल : रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या एका कर्मचाऱ्याने एका व्यक्तीचा जीव वाचवल्याचं दिसत आहे. भारतीय रेल्वेने एच. सतीश कुमार यांचे कौतुक केले आहे आणि त्यांच्यासारखे धाडसी आणि मेहनती कर्मचारी असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीवर, पश्चिम बंगालच्या पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील बालीचक रेल्वे स्थानकावरील 24-सेकंदाच्या CCTV फुटेजमध्ये, रेल्वे कर्मचारी एच. सतीश कुमार येणार्‍या मालगाडीला हिरवा झेंडा दाखवून सिग्नल करताना दिसत आहेत. मात्र, कुमार यांनी प्लॅटफॉर्मवरून मागे वळण्यापूर्वी रुळांवर बघितले, तेव्हा त्यांना रुळांवर कोणीतरी पडलेले दिसले. त्यानंतर, कुमार यांनी थोडाही विलंब न करता लगेच त्या माणसाकडे धाव घेतली आणि रुळांवर उडी मारली. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला उचलले आणि रुळांमधील रिकाम्या जागेत घेऊन गेले. त्यानंतर काही क्षणांनंतर एक ट्रेन त्यांच्या जवळून गेली.

कुमार यांनी काही सेकंद उशीर केला असता तर त्यांनी वाचवलेल्या माणसाला ट्रेनची धडक बसली असती. त्या व्यक्तीने रुळावरून उडी मारली की चुकून पडली हे स्पष्ट झालेले नाही.

रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडिओ शेअर करताना ट्विट केले की, “सेवा, सुरक्षा आणि सहयोग… एका व्यक्तीला वाचवण्यासाठी ऑन-ड्युटी कर्मचार्‍यांनी केलेल्या धाडसी कृतीमुळे एक अनमोल जीव वाचला. एच. सतीश कुमार यांच्यासारखे धाडसी आणि मेहनती कर्मचारी असल्याचा भारतीय रेल्वेला अभिमान आहे आणि त्यांच्या शौर्याचे कौतुक करतो.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago