देश

राफेल गेम चेंजर आणि मल्टी रोल कॅपॅसिटीसोबत शत्रुला धडा शिकवण्यासाठी सक्षम- राजनाथ सिंह

अंबाला हवाई तळावर पाच राफेल लढावू विमानं भारतीय वायुसेनेत औपचारिकरित्या सामील झाले. यावेळी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्या भाषणात म्हणाले कि, ‘भारतानं नेहमीच वसुधैव कुटुंबकम म्हटलंय परंतु, सीमेवर कोणत्याही पद्धतीच्या दु:साहसाचं प्रत्यूत्तर देण्यासाठीही भारत तयार आहे. राफेलचा वायुदलातील सहभाग सीमा सुरक्षा आणि क्षेत्रीय अखंडता कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.’

सीमेवर ज्या पद्धतीचं वातावरण आहे ते पाहता राफेल हवाई दलात सामील होणं महत्त्वाचं आहे. राफेल गेम चेंजर आणि मल्टी रोल कॅपॅसिटीसोबत शत्रुला धडा शिकवण्यासाठी सक्षम असल्याचंही राजनाथ सिंह यांनी यावेळी म्हटलं. वायुसेनेनं आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलंय. फॉरवर्ड सीमेवर तत्काळ विमानं तैनात करून शत्रुला स्पष्ट संदेश देण्यात आलाय. त्यामुळे आता कोणत्याही पद्धतीच्या हालचाली करण्यापूर्वी शत्रू अनेकदा विचार करेल, असं म्हणत त्यांनी वायुदलाचं कौतुक केलं.

फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यादेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. राफेलचा भारतीय वायुदलातील समावेश भारत आणि फ्रान्स दरम्यान असलेल्या दृढ संबंध दर्शवतो. भारत आणि फ्रान्स प्रदीर्घ काळापासून आर्थिक, सांस्कृतिक आणि राजनैतिकरित्या जोडला गेलाय. मजबूत लोकशाहीवर असलेला दृढ विश्वास आणि संपूर्ण जगात शांतीची आशा आमच्या आपांपासांतील संबंधांचा दुवा आहे, असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

19 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago