देश

हाथरस घटनेतील साक्षीदारांच्या संरक्षणासंबंधीच्या उपाययोजनांची माहिती द्या- सर्वोच्च न्यायालय

हाथरस मधील घटना भयंकर असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. तसेच या प्रकरणातील साक्षीदारांच्या सुरक्षेची उपाययोजना काय केली आहे याची माहिती 8 ऑक्टोबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला द्यावी असे निर्देश उत्तर प्रदेश सरकारला दिले आहेत. हाथरसमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार करून तिच्यावर निर्दयपणे अत्य़ाचार करण्य़ात आला होता. त्यातच तिचा मृत्यू झाला.

सर्वोच्य न्यायालयाने याबाबत योगी आदित्यनाथ सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितले आहे आणि पीडितेच्या कुटुंबीयानी त्यांचा वकील निवडला आहे का यासंदर्भात खातरजमा करण्यास सांगितली आहे. उत्तर प्रदेश सरकारने हाथरस प्रकरणात राजकीय हेतूने प्रेरित अफवा पसरत आहेत त्यामुळे या खटल्यात सीबीआयने तपास करावा अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हे मत व्यक्त केले.

सरन्यायाधीश एस.ए.बोबडे, न्या. ए.एस बोपान्ना आणि व्ही. रामसुब्रमन्यम यांच्या खंडपीठाने असे म्हंटले आहे की याप्रकरणी तपास सुरळीत होईल याची निश्चिती सर्वोच्च न्यायालय करेल. आलाहाबाद उच्च न्यायालयासमोर चालणाऱ्या कामकाजाची व्याप्ती आणि सर्वोच्च न्यायालय त्याला कसे प्रासंगिक बनवू शकेल याबाबत सूचना देण्यासाठी सर्व पक्षकारांनी सर्वोच्य न्यायालयासमोर उपस्थित रहावे असेही म्हंटले आहे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उत्तर प्रदेश सरकारची बाजू मांडताना असे म्हंटले आहे की, सीबीआयने हा तपास आपल्या हातात घेतला तर राजकीय हेतूने प्रेरित खोट्या वृत्तांना आळा बसेल. तसेच सीबीआयने हा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली करावा. या प्रकरणात सीबीआय किंवा विशेष तपास टीमने तपास करावा अशी जर याचिका आली तर राज्य सरकार त्याला विरोध करणार नाही. एका तरुण मुलीने तिचा जीव गमावला आहे. या घटनेचे कुणीही भांडवल करू नये. यासंबंधी तपास हा निष्पक्ष असायला हवा आणि निष्पक्ष दिसायला हवा.

जेष्ठ वकिल इंदिरा जयसिंग यांनी पीडितेच्या कुटुंबीयाना संरक्षण पुरवावे अशी मागणी न्यायालयासमोर केली. सीबीआयने हा खटला हाती घ्यावा या मागणीवर पीडितेच्या कुटूंबिय समाधानी नाहीत असे सांगून जयसिंह म्हणाल्या की सर्वोच्च न्यायालायाच्या मार्गदर्शनाखाली एसआयटीने हा तपास करावा. यावेळी सरन्यायाधीश म्हणाले की हा खटला खूप महत्वाचा आहे. ही घटना अत्यंत भयंकर आहे म्हणून आम्ही तुमचे ऐकून घेत आहोत.

हाथरसमध्ये ही घटना 14 सप्टेंबर रोजी घडली होती. पीडितेचा मृत्यू 29 सप्टेंबर रोजी झाला होता. तिचे अंत्यसंस्कार पोलिसांनी परस्पर घाईघाईने उरकले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago