Anniversary of the Indian Air Force
भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन : आज ८ ऑक्टोबर, ८८ वर्षांपूर्वी १९३२ साली याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली. आजच्या ८८ व्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय हवाई दलाबद्दल जाणून घेऊयात.
‘नभ:स्पृशं दीप्तम्।‘ हे भारतीय हवाई दलाचे ध्येयवाक्य आहे. या वाक्याचा भाषांतर वैभवाने आकाश स्पर्श करा असे होते. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् यांनी हवाई दलाचे ध्येयवाक्य म्हणून हे वाक्य सुचविले.
भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे भारतापेक्षा अधिक मोठे हवाई दल आहे.
सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते.
१२ मार्च इ.स. १९४५ रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअरफोर्स असे झाले. १९५० मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या नावातील रॉयल हा शब्द वगळण्यात आला.
भारतीय हवाई दलाची एकूण ६० एअरबेस देशभरामध्ये आहेत. एकूण १ हजार ७०० हून अधिक लढाऊ विमाने तसेच हॅलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे आहे. यात ५०० हून अधिक मालवाहू विमानांचा देखील समावेश आहे.
एकूण सात कमांड्सकडे या सर्व एअरबेसची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये वेस्टर्न एअर कमांडअंतर्गत सर्वाधिक म्हणजे १६ एअरबेस आहेत तर सर्वात कमी म्हणजे सात एअरबेसचे नियंत्रण सेंट्रल एअर कमांडकडे आहे. तझाकिस्तानमधील फर्कहोर येथेही भारतीय हवाई दलाचा एअरबेस आहे. हा कोणत्याही सुरक्षा दलाचा देशाबाहेरील पहिला आणि एकमेव तळ आहे.
परमविरचक्र हा सुरक्षादलातील कामगिरीसाठी देण्यात येणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार मिळवणारे भारतीय हवाई दलातील अधिकारी निर्मल जीत सिंग सिख्खोन हे हवाई दलातील पहिले अधिकारी ठरले. १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पद्मावती बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला एअर मार्शल ठरल्या. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धामधील कामगिरीसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले.
२००४ साली द गरुड कमांडो फोर्स या विशेष तुकडीची भारतीय हवाई दलाच्या अंर्तगत स्थापना करण्यात आली. आज या दलामध्ये दोन हजारहून अधिक कमांडो आहेत. हे दल बचावकार्य, आप्तव्यवस्थापनाअंतर्गत केले जाणारे मदतकार्य करण्याचे काम करते.
सद्याच्या काळात आधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर सी-४ आय ही संगणक प्रणाली भारतीय हवाई दलाकडे आहे.
हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूर अंतरावरील शत्रूच्या विमानांची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरील शत्रूच्या ठिकाणाचा वेध घेणारी यंत्रणा असणारी विमाने अशी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे भारतीय हवाई दलाकडे आहेत. नुकतीच भारतीय हवाई दलात राफेल या लढाऊ विमानांची पहिली तुकडीही सामील करण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये भारतीय हवाई दलाचे एक संग्रहालय आहे. स्थापनेपासून आत्तापर्यंतच्या हवाई दलाबद्दलच्या अनेक आठवणी या संग्रहालयाच्या माध्यमातून जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…