Prime Minister narendra modi in Rajya Sabha
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिलं. यावेळी भाषणात ते म्हणाले कि, आंदोलनजीवी जमात उदयास आली आहे. या जमातीपासून सावध राहण्याची गरज आहे. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत, ते कुणाचंही आंदोलन सुरू असेल तिथे घुसतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, ‘आपण सगळेच काही शब्दांशी परिचीत आहोत, श्रमजीवी, बुद्धीजीवी असे शब्द आपल्याला माहीत आहेत. परंतु, मी पाहतोय कि, गेल्या काही दिवसांपासून देशात एका नव्या जमातीचा जन्म झाला आहे. ती आहे ‘आंदोलनजीवी’ जमात. वकिलांचं आंदोलन सुरू आहे, तिथे ही जमात जाणार. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिथेही दिसणार. मजुरांचं आंदोलन सुरू आहे, तिथेही दाखल होणार. कधी पडद्याच्या मागे तर कधी पडद्याच्या समोर.’
‘ही संपूर्ण टोळीच आंदोलनजीवी आहे. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाहीत. आपण अशा लोकांना ओळखायला हवं. या जमातीपासून सावध राहायला हवं. हे आंदोलनजीवी लोक कधीही स्वत: आंदोलन करत नाही, परंतु, कुणाचंही आंदोलन सुरू असेल तिथे घुसतात. हे आंदोलनजीवी परजीवी आहेत, जे प्रत्येक ठिकाणी भेटतील,’ अशी टोलेबाजी पंतप्रधान मोदींनी केली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…