Police Officer Shot Dead By Terrorists In Pulwama
जम्मू-काश्मीर : दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागात एका पोलीस उपनिरीक्षकाचा गोळ्या झाडलेला मृतदेह रहस्यमय परिस्थितीत सापडला आहे. घटनास्थळावरून दोन पिस्तुल काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे. फारुख अहमद मीर (वय ५०) असे उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते पंपोरा येथील लेथपेरा येथे 23 बटालियन IRP मध्ये तैनात होते. त्यांच्या कुटुंबात वडील, पत्नी आणि तीन मुले – दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे.
प्राथमिक तपासातून समोर आले आहे की, शुक्रवारी संध्याकाळी फारुख अहमद मीर हे सांबुरा येथील आपल्या घराकडून शेतीकडे गेले होते, तेथे दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य करून त्यांची हत्या केली. त्याच्या हृदयाजवळ गोळीसारखी खूण आढळून आली. या हत्येमागे कोणत्या संघटनेचा हात आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग सुरूच
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून टार्गेट किलिंग सुरू आहे. दहशतवादी नागरिकांसोबतच पोलिस कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य करत आहेत. लष्करही दहशतवाद्यांविरोधात वेगवेगळे ऑपरेशन राबवत आहे. काल कुलगाममध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. दोघेही लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचा कुलगाममधील शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येत हात होता.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…