देश

घराला गॅस चेंबर बनवून महिलेची दोन मुलींसह आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

दिल्ली : दिल्लीतील वसंत विहार परिसरात एका घरातून 3 जणांचे मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडले आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे समजले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 8:22 वाजता वसंत विहार पोलिस स्टेशनच्या पोलिसांना पीसीआर कॉलवरून माहिती मिळाली की वसंत अपार्टमेंट सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक-207 मधील खोली आतून बंद आहे आणि घरातील लोक दार उघडत नाहीत. दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि फ्लॅटचा दरवाजा तोडला असता घरात तीन मृतदेह आढळले. खोलीचा दरवाजा आणि खिडकीही आतून बंद होती.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घराची झडती घेतली असता एक सुसाईड नोट सापडली. मंजू आणि तिच्या दोन मुली अंशिका आणि अंकू यांचे मृतदेह आतल्या खोलीत बेडवर पडलेले होते, तपासात तिघींचाही गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले. एप्रिल 2021 मध्ये कुटुंबप्रमुखाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि त्यानंतर मंजूसह संपूर्ण कुटुंब नैराश्यात गेले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले.

आत्महत्येपूर्वी घराला बनवले गॅस चेंबर
पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटनुसार, आई आणि मुलींनी पूर्ण योजना बनवली आणि घराला गॅस चेंबर बनवले. त्यांनी घर पूर्णपणे विषारी वायूने भरले. खिडकी पॉलिथिनने झाकली. त्यानंतर घर पूर्णपणे पॅक करून घरात आग पेटवली. त्यानंतर घरातील गॅस सिलेंडर उघडले. यामुळे विषारी गॅस पसरून आई आणि दोन मुलींचा तडफडून मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलिस घरात गेले तेव्हा त्यांना एक सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये लिहिले होते की दरवाजा उघडल्यानंतर काडीपेटी किंवा लाइटर लावू नका. घरामध्ये अतिशय प्राणघातक असा विषारी वायू भरलेला आहे. मृत्यूनंतर पोलीस जेव्हा आत जातील तेव्हा अपघात होऊ नये यासाठी हे लिहून ठेवले होते. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago