महाराष्ट्र

भूमिका बदलली नाही आणि शब्द पाळला तर ते शरद पवार कसले?: निलेश राणे

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेले संभाजीराजे छत्रपती यांचा पाठिंबा ऐनवेळी मागे घेतल्याच्या मुद्द्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हे होणारच होते. पवार साहेब आणि शब्द पाळला, असे होऊ शकत नाही. भूमिका बदलली नाही ते पवार साहेब कसले? राजे जर शिवसेनेसोबत जाणार तर संजय राऊत दुसऱ्या सीटवर आहे ज्याने मराठा मुक मोर्चाची मुका मोर्चा म्हणून खिल्ली उडवली होती, विसरू नका, अशा आशयाचे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जूनला महाराष्ट्रात निवडणूक होत आहे. यामध्ये दोन जागांवर भाजप आणि प्रत्येकी एका जागेवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा उमेदवार निवडून येणे निश्चित आहे. मात्र, सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने चुरस निर्माण झाली आहे. या सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांना दावा सांगितला होता. त्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संभाजीराजे यांना पाठिंबा जाहीर केला होता. आमचा एक उमेदवार निवडून येण्यात काहीही अडचण नाही. आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यावर राहिलेली मत संभाजीराजे यांना देऊ, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

मात्र, शिवसेनेने सहाव्या जागेवर उमेदवार उतरवणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शरद पवार यांची भूमिका ३६० अंशांनी बदलली. पुण्यातील पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी ही बाब स्पष्ट केली. राज्यसभेच्या जागेसंदर्भात आमच्या पक्षापुरता आमचा निर्णय झाला आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभा निवडणुका झाल्या तेव्हा आमची एकच जागा निवडून येत होती. त्यावेळी दुसरी जागा निवडून आणण्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी ही विनंती मान्य केल्यामुळे मी आणि फौजिया खान राज्यसभेवर निवडून गेलो होतो. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक मते शिवसेना उमेदवाराशिवाय दुसऱ्या कोणाला देता येणार नाहीत. शिवसेना जे नाव राज्यसभा निवडणुकीसाठी देईल, त्यांना आम्ही शिल्लक मतं देऊ. मग तो उमेदवार संभाजीराजे छत्रपती किंवा आणखी कोणीही असो, असे शरद पवार यांनी सांगितले होते.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago