देश

श्रीनगरमध्ये पोलिस कॉन्स्टेबलची दहशतवाद्यांकडून गोळ्या झाडून हत्या, त्यांची 7 वर्षांची मुलगी जखमी

श्रीनगर : श्रीनगरमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. यावेळी त्यांची मुलगीही जखमी झाली. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा सुरक्षा दलांना लक्ष्य केले आहे. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी हवालदार सैफुल्लाह कादरी यांच्यावर सौरा भागातील त्यांच्या घरात गोळीबार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, कादरी यांना सौरा येथील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SKIMS) रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. तर हल्ला झाला त्यावेळी त्यांची ७ वर्षांची मुलगी त्यांच्याजवळच होती. तीदेखील या हल्ल्यात जखमी झाली होती, पण आता तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान, गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस पथके लगतच्या भागात पाठवण्यात आली आहेत.

यापूर्वी, 13 मे रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यातील पोलीस कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठोकर यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्याचवेळी, याच्या एक दिवस आधी 12 मे रोजी बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सरकारी कर्मचारी राहुल भट यांच्या कार्यालयात घुसून त्यांची हत्या केली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago