महाराष्ट्र

महाअनुषाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : महाअनुषा पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास घटकाच्या विकासासोबतच यापुढे पर्यावरण संवर्धनाचे काम व्हावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले. पुणे जिल्ह्यात महाअनुषा पोर्टलला स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूहांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने महाअनुषा पोर्टल अंतर्गत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपायुक्त संतोष पाटील, प्रकल्प संचालक शालीनी कडू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, महाअनुषाचे पंकज पाटील उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्री. राव म्हणाले, महाअनुषा पोटर्लच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात पथदर्शी काम होईल. स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूह यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. इतर विकास उपक्रमांसोबत माझी वसुंधरा अभियानाचाही यामध्ये अंतर्भाव केला जावा. या अभियानात असलेल्या पाच घटकांचा अंतर्भाव करून काम केले तर पर्यावरण संवर्धनात चांगले योगदान देता येईल.

महाअनुषा पोर्टलचा पुणे महसूल विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यात विस्तार केला जाणार आहे. पाचही महानगरपालिकाना यामध्ये समावून घेतले जाणार असल्याचे सांगून कोरोना कालावधीत स्वयंसेवी संस्था व उद्योग समूहाने केलेल्या सहकार्याबदल त्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी महाअनुषा पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेलेल्या उपक्रमाबाबत सादरीकरण केले. पुणे जिल्हयात ६० पेक्षा अधीक उद्योग संस्थांनी सामाजिक दायित्व निधीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. त्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात आदर्श शाळा संकल्पना प्रभावीपणे राबविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

महाअनुषाचे पाटील म्हणाले, सीएसआर निधी आणि प्रकल्पांची योग्य अंमलबजावणी हे सयुंक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत (यूएनडीपी) विकसित केले गेलेले पोर्टल आहे. शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य सेवा केंद्रे सुधारण्यासाठी प्रकल्प अपलोड करण्यात आले आहेत. महाअनुषा पोर्टलवर लॉग इन करण्यास उद्योग समूहांचा चांगला प्रतिसाद असल्याचे ते म्हणाले. कोरोना कालावधीत शासकीय यंत्रणांनी चांगले काम केले आहे, तसेच सामाजिक उत्तरदायित्व निधीतूनही पथदर्शी कामे झालीत,अशा प्रतिक्रिया उद्योग समूहांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या. यावेळी सीएसआरमध्ये सहभागी असलेल्या ६० उद्योग समूहांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्येक समूहाच्या प्रतिनिधीने त्यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमाबाबत माहिती दिली.

असे आहे महाअनुषा पोर्टल
महाअनुषा पोर्टलचा पुणे जिल्ह्यातील शासकीय विविध विभाग, स्वयंसेवी संस्था व उद्योगसमूह हे सर्व या पोर्टलचा वापर करतात. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जे प्रकल्प उभे करायचे असतील ते या पोर्टलवर अपलोड केले जातील. जे उद्योगसमूह त्यांचा सीएसआर निधी या प्रकल्पासाठी देणार आहेत, त्या उद्योगसमूहांना ही प्रक्रिया पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. उद्योगसमूहांना त्यांनी ज्या प्रकल्पासाठी उद्योगसमूहाने निधी दिला त्या प्रकल्पांच्या प्रत्येक टप्प्याचे संपूर्ण परीक्षण करता येणार आहे. सामान्य नागरिकांनाही कोणत्या उद्योगसमूहाने प्रकल्पासाठी किती मदत केली हे पाहता येणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago