Police Memorial Day: 343 police officers and employees martyred in the battle against Corona
गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त दिल्लीतील ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’वर श्रद्धांजली अर्पण केली. करोनाविरुद्धच्या लढाईत आत्तापर्यंत ३४३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. अशी माहिती यावेळी अमित शहा यांनी दिली आहे.
आत्तापर्यंत एकूण ३५ हजार ३९८ पोलीस कर्मचारी शहीद झालेले आहेत. हे स्मारक केवळ विटा, दगड आणि सिमेंटनं बनलेलं स्मारक नाही तर हे स्मारक आपल्या वीर जवानांच्या शहिदत्वाची आठवण करून देतं. स्वातंत्र्यकाळापासून आत्तापर्यंत देशातील सर्व राज्याच्या पोलीस आणि सशस्त्रदलाच्या ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांनी वाहिलेला एक एक रक्ताचा थेंब देशाला विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन गेलाय’ असंही अमित शहा यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत पोलीस स्मृती दिनानिमित्तानं केंद्रीय राखीव पोलिस दलाला (CRPF) शुभेच्छा दिल्या आहेत. पोलिस स्मारक दिन हा संपूर्ण भारतभरातील आपल्या पोलिस कर्मचार्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याविषयी आहे. तसेच आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या नागरिकांना मदत करण्याच्या परिश्रम आणि तत्परतेचा आम्हाला अभिमान आहे, असं त्यांनी म्हटलं आहे
१९५९ साली भारत – चीन तणावादरम्यान आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सीआरपीएफच्या १० जवानांच्या आठवणीत हा दिवस पाळला जातो. त्यानंतर जानेवारी १९६० मध्ये सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या पोलीस महानिरीक्षकांनी वार्षिक परिषदेत सीआरपीएफ जवानांची आहुती विसरता कामा नये, यासाठी २१ ऑक्टोबर हा दिवस ‘पोलीस स्मृती दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…