Chief Minister Uddhav Thackeray's visit to Marathwada today
उस्मानाबाद : बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी म्हणजे आज उद्धव ठाकरे उस्मानाबाद जिल्ह्य़ाचा दौरा करणार आहेत. उस्मानाबादमधील परिस्थितीची पाहणी करण्याबरोबरच शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधतील. पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. परिणामी हजारो हेक्टर पिकांचं नुकसान झालं. जीवितहानी झाली असून जनावरंही दगावली आहे. जवळपास 10 हजार लोकसंख्या असलेल्या काटगावात मोठ्या प्रमाणात ऊस आणि सोयाबीनची लागवड केली जाते.
अतिवृष्टीमुळे गावातून वाहणाऱ्या हरणी नदीला अनेक वर्षांनंतर पूर आला. या पुरात हाताशी आलेलं संपूर्ण पीक अक्षरशः वाहून गेलं आहे, उभा ऊस आडवा झाला आहे. शेतीचं अतोनात नुकसान झालं असून घरांची देखील पडझड झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून इथल्या ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सोलापूर दौरा करुन त्यांनी नुकसानीची पाहणी केली होती. मात्र मदतीबाबत कुठलीही घोषणा केली नव्हती. त्यामुळं आज मुख्यमंत्री मदत जाहीर करणार का याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे सकाळी ९.३० वा. सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावला ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद जातील. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची, शेती व पिकांच्या नुकसानीची पाहणी करून तुळजापूरमार्गे अपसिंगा-कात्री येथे जातील. दुपारी १२ वाजता अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाला जातील. दुपारी एक वाजता पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा व अभ्यागतांना भेटून पत्रकारांशी संवाद साधतील. दुपारी दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृह तुळजापूर येथून सोलापूरला येऊन तेथून विमानाने मुंबईला परत येतील.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…