देश

पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल, १५ डिसेंबरपर्यंत करून घ्या ‘हे’ काम

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्राला भेट देऊन आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण थेट करू शकता. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे ई-केवायसी प्रक्रिया करू शकता.

१५ डिसेंबरपर्यंत पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १० व्या हप्त्याचे २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येतील. जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी दरम्यान ई-केवायसी किंवा ई-केवायई (eKYE) केले नसेल, तर तुमचे हप्त्याचे पैसे थांबू शकतात. ईकेवायसी करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन ईकेवायसी कसे करावे?

  1. https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
  2. त्यानंतर फार्मर कॉर्नरवर जा.
  3. येथे ई-केवायसी (eKYC) च्या नवीन पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एक नवीन पान उघडेल.
  4. त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि नंतर ओटीपी टाका.
  5. जर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, तर ई-केवायसी (eKYC) पूर्ण होईल. प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर स्क्रीनवर इनव्हॅलिड (Invalid) लिहिलेले दिसेल.

ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया इनव्हॅलिड झाल्यास तुमचे पैसे अडकून पडू शकतात. जे तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन दुरुस्त करू शकता. केंद्र सरकार यावर्षीचा पीएम किसानचा शेवटचा हप्ता देणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago