Petrol, diesel prices
औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील खनिज तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता दिसत आहे. मात्र, सध्याचे रशिया आणि युक्रेन युद्ध असेच सुरू राहिले. तर आगामी काही दिवसात पेट्रोलची टंचाई निर्माण होण्याची भीती पेट्रोल पंप असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडू शकते.
पेट्रोलच्या दरवाढीसोबत आता पेट्रोलच्या टंचाईचाही धोका निर्माण झालेला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियावर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. यात रशियाकडून इंधनाच्या खरेदीचा व्यवहारही बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, अन्य पुरवठादार देशांकडून खनिज तेलाची मागणी वाढू शकते. ही मागणी वाढल्यानंतर वाढीव दरात अपेक्षित तेलसाठा मिळेल का, अशी शंका आहे. त्यामुळे आगामी काळात औरंगाबाद सह अन्य शहरांमध्ये पेट्रोल टंचाई निर्माण होण्याचा धोका अधिक असल्याचे संकेत पेट्रोल असोसिएशनकडून दिले जात आहे.
याआधी १९८०च्या दशकामध्ये इराण आणि इराक या दोन देशांत युद्ध पेटले होते. या युद्धानंतर अचानक जगात पेट्रोल टंचाई निर्माण झाली होती. या युद्धावेळी पेट्रोल पंप चालकांना पेट्रोल आणि डिझेलचा निश्चित कोटा देण्यात येत होता. सध्या रशियाकडून युरोपीय देशांना इंधनाचा पुरवठा होतो. त्यामुळे, रशियावरील निर्बंधांनंतर जगामध्ये पुन्हा एकदा पेट्रोल टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पेट्रोल टंचाईचा धोका निर्माण झाला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…