देश

विंग कमांडर अभिनंदनला पकडलं पण.. पाकिस्तानी लष्करप्रमुखांना फुटला होता घाम

गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी रोजी विंग कमांडर अभिनंदनला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते. पाकिस्तानी एअरफोर्स विरूद्धच्या कारवाईत भारतीय पायलट अभिनंदन यांचे ‘मिग २१’ क्रॅश झाले होते. तेव्हा त्यांनी पॅराशूटने उतरुन आपला जीव वाचवला, परंतु ते पाकिस्तान मध्ये लॅन्ड झाले. पाकिस्तानी सैन्याने त्यांना तिथे ताब्यात घेतले. परंतु नंतर भारताची आक्रमकता पाहून त्यांनी माघार घेतली आणि 1 मार्च रोजी अभिनंदन यांना अटारी-वाघा सीमेवरून भारतात परत पाठवले.

या प्रकरणात बुधवारी पाकिस्तान मुस्लिम लीग-एन (पीएमएल-एन) नेते अयाज सादिक यांनी पाकिस्तान नॅशनल असेंब्लीमध्ये स्पष्ट केलं की, परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी तेव्हा झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत म्हटले होते कि,  जर अभिनंदन यांना सोडलं नाही, तर भारत रात्री 9 वाजेपर्यंत हल्ला करेल.

सादिक यांनी विरोधी नेत्यांना सांगितले की, कुरेशी यांनी PPP, PML-N आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यासह इतर नेत्यांसमवेत या विषयावर बैठक घेतली होती. ते पुढे म्हणाले कि, मला आठवते की या बैठकीदरम्यान लष्करप्रमुख बाजवा कक्षात आले होते, त्यावेळी त्यांचे पाय थरथर कापत होते आणि त्यांना घाम फुटला होता. इम्रान खान यांनी बैठकीस येण्यास नकार दिला होता. परराष्ट्रमंत्री बैठकीत लष्करप्रमुखांना म्हणाले होते, अभिनंदनला भारतात परत जाऊ द्या, अन्यथा भारत हल्ला करेल. (अल्लाह के वास्ते अभिनंदन को जाने दो, नहीं तो भारत हमला कर देगा।)

भारताचे माजी हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस. धानोआ म्हणाले, “आम्ही अभिनंदनच्या वडिलांना सांगितले होते की आम्ही त्याला नक्की परत आणू.” ते (पाकिस्तान नेते) असे म्हणत आहेत कारण आमची सेना आक्रमक होती. आम्ही त्यांचे (पाकिस्तान) फॉरवर्ड पोस्ट उध्वस्त करण्यास तयार होतो. त्यांना आमची क्षमता माहित आहे. ‘

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

1 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago