देश

Omicron Varinat : मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले, WHO च्या अहवालाने वाढवली भारताची चिंता

Omicron Varinat : कोरोनाचा ओमिक्रॉन व्हॅरिएंट जगातील अनेक देशांमध्ये पसरला आहे. जगभरातील डॉक्टर आणि आरोग्य तज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला क्लिनिकल अहवाल सादर केला आहे. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेत 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांची बाधित होण्याची संख्या वाढल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत ओमिक्रॉन मुलांसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी भीती आहे. त्यामुळे मुलांच्या लसीकरणाबाबत पुन्हा एकदा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भारतासाठीही ही धोक्याची घंटा आहे. कारण भारतात फक्त १८ वर्षांवरील लोकांना लसीकरण केले जात आहे.

WHO च्या तज्ञांच्या गटाने सांगितले होते की प्रौढ लोकांना सध्या ओमिक्रॉनची किरकोळ लक्षणे दिसत आहेत. बहुतेक संक्रमित लोकांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. WHO च्या युरोप कार्यालयाने देखील सांगितले होते की 5 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये संसर्ग वेगाने वाढत आहे. डब्ल्यूएचओ युरोपचे प्रादेशिक संचालक डॉ. हॅन्स क्लूज यांनी सांगितले की, युरोपातील अनेक देशांत मुलांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण दोन ते तीन पटीने वाढले आहे. तथापि, ते असेही म्हणाले की वृद्ध, आरोग्यसेवा कर्मचारी आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांपेक्षा लहान मुलांना कमी गंभीर संसर्गाचा सामना करावा लागतो. आतापर्यंत, जगभरातील 21 देशांमध्ये 432 ओमिक्रॉन व्हॅरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

कोरोनाव्हायरसची तिसरी लाट आणि ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, मुलांच्या लसीकरणाची प्रतीक्षा आहे. भारतात, Zydus Cadila ची ZyCoV D लस सप्टेंबरमध्ये मंजूर झाली आहे. तज्ञ समितीने 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना Covaxin देण्याची शिफारस केली आहे. परंतु औषध नियामकाने त्यास मान्यता दिलेली नाही. तसेच नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) ची बूस्टर डोस आणि मुलांसाठी लसीसंदर्भात सोमवारी बैठक झाली. मात्र त्याचा मसुदा अद्याप तयार झालेला नाही. म्हणजेच लहान मुलांसाठीची कोरोना लस अद्याप प्रलंबीत आहे.

IMA चा भारतासाठी जो अहवाल आला आहे, त्यात भारत पुन्हा पूर्वीच्या स्थितीत जात असून ते रोखण्यासाठी योग्य व्यवस्था करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे, अन्यथा तिसरी मोठी लाट येऊ शकते. Omicron प्रकार दक्षिण आफ्रिकेत पसरला आहे, रुग्णालयांमध्ये मुलांची संख्या वाढत आहे. हे पाहता सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे योग्य पालन व्हायला पाहिजे. तसेच जे तरुण लसीकरणास पात्र आहेत, त्यांना लसीकरण करणे आवश्यक आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago