देश

लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, सीडीएस बिपीन रावत रुग्णालयात दाखल

तामिळनाडू : तामिळनाडूमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत हेलिकॉप्टरमध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आहे. ४ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. इतरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेत ३ गंभीर जखमी झाले आहेत.

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हवाई दलाचे हे Mi-17V5 हेलिकॉप्टर होते. सीडीएस जनरल बिपीन रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.

हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांच्यासह जवळपास १४ जण होते. रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, आणि रावत यांची पत्नी या हेलिकॉप्टर मध्ये होते. हे हेलिकॉप्टर हवाई दलाच्या तळावरून कुन्नूरकडे जात होते. दोन मृतदेह ८० टक्के जळालेल्या स्थितीत आढळून आले आहेत. इतर मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago