देश

आता कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावणे बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आतापासून कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. तुम्ही समोरच्या सीटवर बसलात किंवा मागच्या बाजूला, प्रत्येकाला सीट बेल्ट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मोठी गोष्ट म्हणजे चालकाच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्यास चालानही कापले जाणार आहे. मागे बेल्ट लावण्यासाठी क्लिपची व्यवस्था केली जाईल.

मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट न लावल्यास अलार्म वाजत राहतो, असेही सांगितले जात आहे. यासंबंधीचा आदेश येत्या १५ दिवसांत जारी केला जाणार आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार अपघातात मृत्यू झाला. त्यांची कार मुंबईजवळ दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. प्राथमिक तपासात, पोलिसांच्या लक्षात आले की, अपघाताचे कारण ओव्हरस्पीड आणि चुकीच्या बाजूने ओव्हरटेकिंग होते. मागे बसलेल्या सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला नसल्याचेही बोलले जात आहे.

आता या सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. पूर्वी ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावायचा, असा नियम होता. पण आता मागे बसलेल्या व्यक्तीलाही तो नियम पाळावा लागणार आहे. रस्ते अपघात कमी व्हावेत यासाठी अधिक सुरक्षिततेवर भर दिला जात आहे. लोकांनी हा नियम विसरू नये, म्हणून वाहनातील अलार्म यंत्रणा कार्यान्वित करण्याचेही बोलले जात आहे. कारमध्ये बसलेल्या कोणीही सीट बेल्ट लावला नाही तर अलार्म वाजत राहील, अशा परिस्थितीत लोकांना नियम पाळणे भाग पडेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago