देश

ICMR कडून नवीन नियमावली जाहीर, प्रवासासाठी आता RT-PCR चाचणी अनिवार्य नाही, पण…

नवी दिल्ली : आंतरराज्य प्रवासासाठी RT-PCR चाचणी करणे अनिवार्य नसल्याची सूचना इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) जारी केली आहे. ही सूचना पूर्णपणे स्वस्थ असलेल्या नागरिकांसाठीच आहे. मात्र, ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहेत, त्यांनी प्रवास टाळावा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे टेस्ट लॅबवर पडणारा ताण कमी करण्यासाठी ही नियमावली जारी करण्यात आली आहे.

एकदा RT-PCR किंवा RAT चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीची दुसऱ्यांदा चाचणी करू नये, असे देखील ICMR ने आपल्या नियमावलीत म्हटले आहे. यामुळे टेस्ट लॅबवरील ताण कमी होईल व टेस्ट रिपोर्ट वेळेवर मिळण्यास मदत होईल. यामुळे आंतरराज्य प्रवास देखील सोपा होईल. नवीन आदेशानुसार ज्यांना कोरोना व्हायरसची कोणतीही लक्षण नाहीत, त्यांना कोरोना चाचणी करण्याची आवश्यकता नाही. हा नियम बस, ट्रेन आणि विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी लागू असेल. ICMR ने अत्यावश्यक सेवा वगळता आंतरराज्य प्रवास टाळण्याचा देखील सल्ला दिला आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणं दिसत आहे, अशा लोकांनी प्रवास टाळावा. सर्व प्रवाशांना कोव्हिड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करणे अनिवार्य आहे. दरम्यान, काही राज्यांनी लॉकडाऊन दरम्यान प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य केले आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सरकारच्या डिस्चार्ज धोरणानुसार, हॉस्पिटलमधून घरी सोडताना कोरोना रुग्णांची पुन्हा चाचणी करणे आवश्यक नसेल. सध्या देशात RT-PCR, TrueNAT, CBNAAT आणि अन्य प्लॅटफॉर्म्सवरील एकूण २५०६ टेस्ट लॅब आहेत. येथे तीन शिफ्टमध्ये दररोज १५ लाख चाचण्या होत आहेत. दररोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येसह वेळेवर टेस्ट रिपोर्ट देण्याचा दबाव देखिल लॅब्सवर आहे. आयसीएमआरने चाचण्या वाढविण्याचा सल्ला दिला आहे व सर्व सरकारी आणि खासगी आरोग्य सुविधांमध्ये यासाठी परवानगी देण्यास सांगितले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago