देश

नितीन गडकरींची मोठी घोषणा, टोल बाबत सरकारचा अत्यंत महत्वाचा निर्णय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, येत्या एक वर्षात सर्व टोलनाके हटवण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. येत्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांना तितकाच टोल भरावा लागेल, जितका ते रस्त्याचा वापर करतील.

अमरोहा येथील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वरजवळील रस्त्यावर नगरपालिका हद्दीत टोल प्लाझा असण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले की, मागील सरकारच्या रस्ते प्रकल्पांच्या कंत्राटांमध्ये असे अनेक टोल प्लाझा बांधले गेले आहेत. हे नक्कीच चुकीचे आणि अन्यायकारक आहे. ते पुढे म्हणाले की, आता जर हे टोल प्लाझा हटविण्यात आले, तर रस्ता बनविणारी कंपनी भरपाईची मागणी करेल. पण सरकारने पुढच्या एका वर्षात देशातले सर्व ‘टोल’ हटवण्याची योजना आखली आहे.

गडकरी म्हणाले की, टोल संपविणे म्हणजे टोल प्लाझा संपवणे. आता सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करीत आहे ज्यामध्ये, जिथून आपले वाहन महामार्गावर चढेल, तेथून जीपीएसच्या मदतीने कॅमेरा आपला फोटो घेईल आणि आपण महामार्गावरुन उतरतानाचा फोटो घेईल. त्यामधील अंतर जितके असेल तितकाच टोल आपल्याला भरावा लागेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago