baby
हरियाणा मधील गुरुग्राम येथे सेक्टर-56 मधील अलकनंदा अपार्टमेंटमध्ये एका महिलेला आपल्या १३ महिन्यांच्या बाळाला केअरटेकर कडे ठेवणं खूपच महागात पडलं आहे. 15 वर्षांच्या या अल्पवयीन केअरटेकरने बाळाला इतकं जोरात आपटलं की बाळाच्या चार बरगड्यांची हाडे मोडली. याव्यतिरिक्त बाळाला किडनी, यकृत आणि इतर अवयवांवर देखील दुखापत झाली आहे. हे बाळ सध्या व्हेंटिलेटरवर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळाचे वडील निखिल भाटिया यांनी तक्रार दिली आहे. हे पती-पत्नी दोघेही कामावर जातात. त्यांना 13 महिन्यांची मुलगी जाएना भाटिया आहे. या जोडप्याने त्यांची कुक सबीना हिच्या माहितीतल्या एका 15 वर्षाच्या मुलीला बाळाच्या देखरेखीसाठी कामावर ठेवलं होतं. तिला 3 महिन्यांपूर्वी नोकरीवर घेण्यात आले होते आणि दरमहा 9 हजार रुपये दिले जात होते.
सोमवारी निखिल आणि त्याची पत्नी जसमीत खरेदी करण्यासाठी बाजारात गेले होते. त्यांनी आपल्या 13 महिन्यांच्या मुलीला झोपवलं आणि घरी केअरटेकर कडे सोडलं होतं. सुमारे एक तासानंतर जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांचं बाळ जोरजोरात रडत होतं. त्यामुळे घाबरून त्यांनी तातडीने बाळाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे बाळाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी बाळाची तब्येत खूप खराब असल्याचे सांगून बाळाला त्वरित आर्टिमिस हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. जेव्हा या जोडप्याने बाळाला आर्टिमिस रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी उपचार सुरू केले. डॉक्टरांनी सांगितले की मुलीच्या चार बरगड्यांची हाडे मोडली आहेत. तसेच, बाळाच्या किडनी, यकृत आणि इतर अवयवांना दुखापत झाली आहे. बाळ सध्या व्हेंटिलेटरवर आहे.
याप्रकरणी बुधवारी या केअरटेकर मुलीविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी बाळाच्या वडिलांविरूद्ध देखील अल्पवयीन मुलीला कामासाठी ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अल्पवयीन केअरटेकरने बाल कल्याण समितीला सांगितले की ते बाळ रडत होतं, शांत होत नव्हतं म्हणून तिने बाळाला रागाच्या भरात आपटलं होतं. दरम्यान, तक्रारीनंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं. त्यासोबतच तिचे समुपदेशनही केले जात आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…