naxals blew up a railway track in chakradharpur railway mandal howrah mumbai route affected
रांची : नक्षलवाद्यांनी झारखंडच्या चक्रधरपूर रेल्वे विभागात रविवारी रात्री रेल्वे ट्रॅकवर स्फोट घडवून आणला. रात्री २ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे हावडा-मुंबई मुख्य रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच चक्रधरपूर रेल्वे विभागाकडून तातडीने संबंधित रेल्वेचं संचालन रोखण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, चक्रधरपूर रेल्वे विभागाच्या लोटापहाडजवळ नक्षलवाद्यांनी लँडमाईन्सच्या मदतीनं रेल्वे ट्रॅकवरच स्फोट घडवून आणला. लँडमाईन्स स्फोटामुळे रेल्वे ट्रॅकला मोठं नुकसानं झालं. त्यामुळे हावडा – मुंबई मुख्य रेल्वे मार्गावर रेल्वेचं संचालन आताच शक्य नाही. चक्रधरपूर रेल्वे विभागाच्या वेगवेगळ्या स्टेशन्सवर प्रवासी रेल्वे अडकून पडल्या आहेत.
नक्षलवाद्यांकडून रेल्वे ट्रॅक उडवण्यात आल्याचं माहिती मिळताच जिल्हा पोलीस, आरपीएफ सोबतच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची अधिक चौकशी सुरू आहे. लवकरच रेल्वे ट्रॅक दुरुस्त करून थांबलेल्या रेल्वेचं संचालन सुरू करण्यात येईल आणि परिस्थिती पूर्ववत होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…