देश

पीएम केअर फॉर चिल्ड्रेन : कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी मोठी भेट, योजनेचे तपशील जाणून घ्या

नवी दिल्ली : मार्च 2020 मध्ये देशात आणि जगामध्ये कोरोना महामारीची सुरुवात झाल्यानंतर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मुले अनाथ झाली आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक गमावले आहेत त्यांच्यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना सुरू केली आहे.

30 मे 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना सुरू केली. या योजनेची सुरुवात करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन पासबुक आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व्हर्च्युअल हेल्थ कार्ड देखील लॉन्च केले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर, सरकारने मोठ्या संख्येने अनाथ मुलांना आर्थिक मदत जाहीर केली होती आणि त्यांच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी या योजनेची सुरुवात केली होती. चला तर मग या योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल जाणून घेऊ…

पीएम केअर योजनेंतर्गत मुलांना मिळणारे लाभ :

  1. कोरोना महामारीच्या काळात अनाथ झालेल्या मुलांना 18 वर्षे वयापर्यंत दरमहा 4,000 रुपये मानधन दिले जाणार आहे.
    मुलाचे वय 23 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
  2. मुलांना मोफत शिक्षणाचा लाभ मिळेल.
  3. 11 ते 15 वर्षे वयापर्यंत मुलांना नवोदय विद्यालय किंवा कोणत्याही निवासी शाळेत प्रवेश दिला जाईल.
  4. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कर्ज मदत दिली जाईल. कर्जावरील व्याज पीएम केअर फंडातून दिले जाईल.
  5. शासकीय आयुष्मान भारत योजनेंतर्गत अशा बालकांना 18 वर्षे वयापर्यंत 5 लाख रुपयांचे आरोग्य कार्ड दिले जाणार आहे.
  6. दुसरीकडे, जर एखाद्या मुलाचा प्रवेश खाजगी शाळेत झाला तर त्याची फी पीएम केअर्स फंडातून दिली जाईल.
  7. मुलांच्या फी व्यतिरिक्त शालेय गणवेशाचा खर्च पीएम केअर फंडातून दिला जाईल.

कोरोना महामारीमध्ये ज्या मुलांनी आपले पालक गमावले आहेत त्यांच्या मदतीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे अशा मुलांच्या संगोपनापासून इतर खर्च सरकार उचलणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago