मनोरंजन

मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट सरस्वती दासची आत्महत्या, गेल्या 15 दिवसांतील चौथी घटना

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत तीन मॉडेल्सच्या मृत्यूचे गूढ उकलत नव्हते, तोच आता आणखी एका मॉडेल आणि मेकअप आर्टिस्टने आत्महत्या केली आहे. या मॉडेल आणि मेकअप आर्टिस्टचा मृतदेह कोलकाता, पश्चिम बंगालमधील तिच्या घरातून सापडला आहे. या मॉडेलचे नाव सरस्वती दास आहे. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती धडपडत होती, असे सांगितले जात आहे. पंधरा दिवसांतील ही चौथी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेक-अप आर्टिस्ट सरस्वती दास हिचा मृतदेह रविवारी सायंकाळी उशिरा कोलकाता येथील कस्बा भागात तिच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. असे सांगितले जात आहे की, सरस्वती दास मेकअप व्यतिरिक्त व्हिडिओ शूट आणि खाजगी शिकवणी करून आपला उदरनिर्वाह करत होती.

प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात ही आत्महत्या असल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती दास मध्यरात्री तिच्या आजीसोबत शेअर केलेल्या खोलीत झोपायला गेल्या होत्या. मध्यरात्री आजीने पाहिले की सरस्वती खोलीत नाही. ती दुसऱ्या खोलीत गेली असता तिने पंख्याला गळफास घेतलेले दिसले. कुटुंबीयांनी सरस्वतीला सीएनएमसी रुग्णालयात नेले, जेथे तिला मृत घोषित करण्यात आले. माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पीडितेने तिचा अभ्यास सोडून ट्यूशन आणि मॉडेलिंगचे काम करण्यास सुरुवात केली होती.

आत्महत्येमागील कारण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तिचे अफेअर होते आणि अलीकडच्या काळात त्यांच्या नात्यातील काही तणावामुळे ती डिप्रेशनमध्ये जात होती. वडील आईपासून विभक्त झाल्याने सरस्वती दास 17 वर्षांपासून तिची आई आरती दाससोबत तिच्या मामाच्या घरी राहत होती. तिच्या मृत्यूचे खरे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

यापूर्वी 25 मे रोजी बिदिशा डे हिने आत्महत्या केली होती. तसेच मंजुषा नियोगी 27 मे रोजी तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. 15 मे रोजी पल्लवी डे ही देखील तिच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago