Mig Crash In Rajasthan Barmer Of Indian Airforce
जयपूर : राजस्थानमधील बाडमेर मध्ये एक मिग एअर क्राफ्ट क्रॅश झालं आहे. ही घटना रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. विमानाचे तुकडे अर्धा किलोमीटर परिसरात पडले असल्याची माहिती समोर आले आहे. एअरफोर्सचं विमान मिग-२१ अपघातग्रस्त झालं असून यामध्ये दोन पायलट होते, अशी माहिती आहे. ही दुर्घटना बाडमेरच्या बायतू क्षेत्रातील भीमडा गावात घडली आहे. एअरफोर्सचं विमान मिग-२१ भीमडा गावाजवळून उड्डाण घेत होतं. अद्याप विमान का दुर्घटनाग्रस्त झालं याची माहिती समोर आली नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि वायूसनेचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.
भारतीय हवाई दलाचं मिग फायटर २१ हे विमान राजस्थानातील भीमडा गावात कोसळलं. या घटनेत भारतीय हवाई दलाचे दोन पायलट जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, ते दोन्ही पायलट शहीद झाल्याची माहिती आहे. विमानाचे पायलट नेमके कोण होते, याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेचा थरार व्हिडिओ देखील समोर आला आहे. बैतू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमडा येथे जोरदार स्फोट होऊन विमान पडले. स्फोटाचा आवाज ऐकून स्थानिक घटनास्थळी दाखल झाले. विमान कोसळल्यानंतर मोठे आगीचे लोळ उठले. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. यात अपघातानंतर विमानाच्या अवशेषाला आग लागल्याचे दिसत आहे. जमिनीवर पायलटचा मृतदेहही दिसत आहे. मिग-२१ कोसळल्याच्या घटनेची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे हवाई दलप्रमुख व्ही.आर. चौधरी यांच्याशी चर्चा केली आहे. हवाईदल प्रमुखांनी या घटनेबद्दल राजनाथ सिंह यांना माहिती दिली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…